मानवची गोष्ट...
मानवची गोष्ट © डॉ. अलोक पवार शामराव बागवे यांनी त्यांच्या शेतात संत्री लावली. लवकरच त्यांच्या शेतात संत्री यावी म्हणून त्यांनी उत्तम असा व्यक्ती शेताकडे लक्ष देण्यासाठी नेमायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कृषी तंत्रज्ञान असलेला व्यक्ती नेमला. मानव भोसले याला ही जवाबदारी देण्यात आली. मानव आपले काम प्रामाणिकपणे करत होता. एक - एक झाडाकडे तो जातीने बघायचा. झाडावर कीड लागू नये म्हणून तो काटेकोर पणे लक्ष द्यायचा. झाडाला पाणी घालणे , खत फवारणी करणे याकडे तो पाहणी करायचा. शामराव , मानव याच्या कामगिरीवर प्रचंड खुश होते. प्रामाणिक पणे काम करणाऱ्या मानवसाठी त्यांनी शेतात उत्तम घर देखील बांधले. मानव त्याचे काम दिवसेंदिवस उत्तम करू लागला होता. शेतासाठी लागणाऱ्या सरकारी योजना यांच्याकडे देखील तो लक्ष द्यायचा. झाडाला लागलेल्या संत्र्यांना फक्त भारतातच नाही तर बाहेरून देखील मागणी होती. शेतात काम करणाऱ्या स्त्री वर्गाला देखील मानव काम कसे करायचे , फळांना कसे सांभाळायचे हे तो व्यवस्थित समजावून सांगत. वय झाल्यामुळे शामराव निधन पावतात. मात्र मानव आपले काम चोखरित्या पार पाडत असतो. आपल्या सर्...