Posts

विधाते सरांचा वाढदिवस आणि वृक्षारोपण

Image
  डॉ. हरिदास विधाते सरांचा वाढदिवस आणि वृक्षारोपण  © प्रा. डॉ. अलोक पवार  साधारण ३ ते ४ वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझा विद्यार्थी आकाश सावित्रीबाई फुले विद्यापीठच्या परीक्षा नियंत्रक शालिग्राम सर यांना भेटलो होतो. आकाश ने ठरवून त्यांना गाठून गावातल्या अडचणी सांगून काही उपाय मिळतो आहे का यावर चर्चा निश्चिती केली होती. आमच्याकडे गावाला पाऊसच पडत नही, नुसता कोरडा दुष्काळ, मग आम्हा युवकांचे सर्व प्रश्न, पुण्याला जायचे का, शेती तशीच ठेवायची का... आकाश ने बऱ्याच अडचणी मांडल्या होत्या. सरांनी सर्व समजून घेऊन त्याला एक प्रश्न विचारला जो पाऊस अगदी थोडाफार पडतो त्याचे तुम्ही काय करता, त्याच्या पाण्याचे तुम्ही काय करता. त्या पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यासाठी तुम्ही काय करता?  आकाश आणि अगदी मी दोघेही निरुत्तर होतो. असणाऱ्या गोष्टींची किंमत नसते ना... तर त्या पावसाच्या थेंबाचे करणार काय? शालिग्राम सरांनीच आम्हाला एक उपाय सांगितला होता. पावसाचे पाणी जमिनीवर पडले तर अधिक तापमानामुळे पाण्याचे आर्दतेत रूपांतर होते. आणि पाणी गायब. तेच पाणी आपल्या भुगर्भात काही दिवस राहू श...

मानवची गोष्ट...

Image
  मानवची गोष्ट © डॉ. अलोक पवार शामराव बागवे यांनी त्यांच्या शेतात संत्री लावली. लवकरच त्यांच्या शेतात संत्री यावी म्हणून त्यांनी उत्तम असा व्यक्ती शेताकडे लक्ष देण्यासाठी नेमायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कृषी तंत्रज्ञान असलेला व्यक्ती नेमला. मानव भोसले याला ही जवाबदारी देण्यात आली. मानव आपले काम प्रामाणिकपणे करत होता. एक - एक झाडाकडे तो जातीने बघायचा. झाडावर कीड लागू नये म्हणून तो काटेकोर पणे लक्ष द्यायचा. झाडाला पाणी घालणे , खत फवारणी करणे याकडे तो पाहणी करायचा. शामराव , मानव याच्या कामगिरीवर प्रचंड खुश होते. प्रामाणिक पणे काम करणाऱ्या मानवसाठी त्यांनी शेतात उत्तम घर देखील बांधले. मानव त्याचे काम दिवसेंदिवस उत्तम करू लागला होता. शेतासाठी लागणाऱ्या सरकारी योजना यांच्याकडे देखील तो लक्ष द्यायचा. झाडाला लागलेल्या संत्र्यांना फक्त भारतातच नाही तर बाहेरून देखील मागणी होती. शेतात काम करणाऱ्या स्त्री वर्गाला देखील मानव काम कसे करायचे , फळांना कसे सांभाळायचे हे तो व्यवस्थित समजावून सांगत. वय झाल्यामुळे शामराव निधन पावतात. मात्र मानव आपले काम चोखरित्या पार पाडत असतो. आपल्या सर्...
काही दिवसांपूर्वी एक छोटासा साप घराच्या जवळ सापडला, मी आणि माझ्या विद्यार्थ्याने त्याला पकडून कात्रजच्या सर्प उद्यानात त्याला सोडायला गेलो होतो. मी आपला साधा प्रश्न विचारला, या सापाची आई वडील त्याला शोधत असतील, पुढे ते मला काय त्रास दिला त्यांनी तर... सर्प उद्यानातील अधिकारी अगदी शांत स्मित करीत म्हणाले साप हे माणसासारखे सोशल नसतात, त्यांना ही नाती यात गंध नसतो, अंडी टाकून ते निघून जातात. पक्षांचे पण ऐकले होते, पिल्लं मोठी झाली की ते आपल्या आईने किंवा वडिलांनी बांधलेले घरटे सोडून उडून जातात. म्हणजे काय तेही माणसासारखे सोशल नसतात म्हणायला काही हरकत नाही. पुढे अगदी गाय, बैल, कुत्रा, मांजर किंवा कोणताही प्राणी माणसाकडून खायला भेटते म्हणून ते मांसाळतात पण त्यांची स्वतःच्या जमातीमध्ये सोशल असण्याची शक्यता फारच कमी राहते.  पण खरचं माणूस हा सोशल आहे का ? त्याच हे सामाजिकीकरण कसे होते, आपले आई-वडील, समाज त्याची भूमिका नक्की काय असते या सर्वच विचारात घेणाच्या गोष्टी. प्रत्येक आई वडील आपल्या जन्म दिलेल्या मुलाला अगदी खूपच मेहनतीने सांभाळतात, त्यांनी त्याला सांभाळणे आणि वाढवणे, त्याच्या लहानप...

पर्यावरण दिन

Image
पर्यावरण दिन : ५ जून  प्रा. अलोक पवार  आज ५ जून च्या निमित्ताने जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. आपण बालपणीपासून पर्यावरणाचा अभ्यास करत आलोय. अगदी हिरवे हिरवे गार गालीचे... अशा कविता देखील म्हणल्या आहेत. मग अगदी दहावीपर्यंत असो किंवा महाविद्यालयातील तो एक विषय असो सर्वांमध्ये आपण ' पर्यावरण' या विषयाचा अभ्यास केलाच केला. मात्र तरीदेखील आजचा दिवस आपण मोल्यवान समजतो आणि आजकालच्या मोबाईल अवेअरनेसच्या जमान्यात स्टेटसला ठेवण्यासाठी का होईना, आपण पर्यावरण दिन साजरा करतो. मी तर म्हणतो केलाच पाहिजे. करणे भागच आहे. नाहीतर आज जी आपण कोरोनाची परिस्थिती पाहतोय ती अजून कुठेतरी गंभीर झाली असती. का ते तुमच्या हा लेख वाचल्यावर लक्षात येईलच. आपल्याला पर्यावरण म्हणजे घराबाहेर पडलो तर झाडे दिसायला लागली, जंगलात गेलो तर डोळ्यांना दिसणारा हिरवागार निसर्ग किंवा स्वच्छ नद्या समुद्र इतकेच नाही तर आपल्या सभोवताली जे जे काही आहे तो सर्व पर्यावरणाचा भाग आहेत. अगदी आपल्या नाकपुड्यांद्वारे आपण श्वास घेतो तेथे देखील स्वच्छ पर्यावरण म्हणजेच प्राणवायू असतो नाहीतर आपली परिस्थिती त्या व्यक्तीसारखी असती जो...

स्वच्छता 'त्या' दिवसातली

Image
बोलायचे आहे अशा स्वच्छतेविषयी जिथे नेहमीच बोलण्यास लाजल्यासारखे होते प्रा. अलोक अर्जुन अलका पवार  आज २८ मे, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस. काही वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचा एक चित्रपट 'पॅडमॅन' आला आणि आपण तो पाहिला, अक्षय कुमार ने घेतलेल्या मोठ्या पावलावर बऱ्याच ठिकाणी चर्चादेखील झाली. आम्ही अगदी गावामध्ये हा चित्रपट मोठा पडदा लावून दाखवला पण. मात्र आजही भारतात, प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात देखील सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी, त्या काळातील स्वच्छता या बाबतीत बोलणे, बहुतांशी शाळा महाविद्यालयांंत शिक्षण सोडा मात्र घरी देखील अशा चर्चा या अगदी वाळीत टाकणाऱ्या समजल्या जातात.  मध्ये जीएसटी सुरू झाला तेंव्हा पुण्यामध्ये हुजूरपागा महिला महाविद्यालयात एक चर्चा सत्र आयोजित केले होते. त्यामध्ये आम्ही एक पेपर सादर केला होता. सरकारने बऱ्याच गोष्टींवर जीएसटी लावला होता. त्यामध्ये सॅनिटरी पॅडवर देखील जीएसटी लावला होता आमचा संशोधन पेपर त्यावरच आधारलेला होता. सॅनिटरी पॅडवर एक पुरुष पेपर सादर करतोय तोही चक्क महिला महाविद्यालयात. बऱ्याच मुली बोलायला तयार नव्हत्या. हेच होते नेहमी की य...

वाढदिवस, पार्टी आणि बरंच काही .....

Image
वाढदिवस, पार्टी आणि बरंच काही ..... वाढदिवस म्हणजे असे एकदम भारी असते. हा म्हणजे वय वाढून थोड म्हातारपणाकडे घेऊन जाणारे असते पण एक नवीन उत्सुकता असते. दरवर्षी असे चला वाढदिवस येणार आहे घरघुती का होईना पार्टी करायची आहे. मग नवीन कपडे मस्तपैकी केक आणि असे बरेच काही याची मस्त अशी धूमधाम असतेच. माझ्या वाढदिवसाला माझ्या महाविद्यालयात एक वेगळाच उत्साह असतो दरवर्षी, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण प्राचार्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजेत असा एक मानस असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली आहे. माझे चिमुकले घरी अडकले आहेत. ऑनलाईन वर्ग चालू आहेत. पण वर्षाच्या या ऑनलाईन पद्धतीला विद्यार्थी देखील कंटाळले आहेत.  माझ्या आईच्या गावाला म्हणजे अगदी मामाच्या गावाला मोहोपाड्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजनाचा कार्यक्रम चालू असतो. शिवसेना प्रमुख स्वर्गीय  कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने माझे मामाश्री कै. विजय बाळकृष्ण मुंढे याने मोहोपाडा येथे शिवसेना या पक्षाचे कार्यालय स्थापले. तेंव्हापासून बऱ्याच नवनवीन गोष्टी मोहोपाड्यात ये...