काही दिवसांपूर्वी एक छोटासा साप घराच्या जवळ सापडला, मी आणि माझ्या विद्यार्थ्याने त्याला पकडून कात्रजच्या सर्प उद्यानात त्याला सोडायला गेलो होतो. मी आपला साधा प्रश्न विचारला, या सापाची आई वडील त्याला शोधत असतील, पुढे ते मला काय त्रास दिला त्यांनी तर... सर्प उद्यानातील अधिकारी अगदी शांत स्मित करीत म्हणाले साप हे माणसासारखे सोशल नसतात, त्यांना ही नाती यात गंध नसतो, अंडी टाकून ते निघून जातात. पक्षांचे पण ऐकले होते, पिल्लं मोठी झाली की ते आपल्या आईने किंवा वडिलांनी बांधलेले घरटे सोडून उडून जातात. म्हणजे काय तेही माणसासारखे सोशल नसतात म्हणायला काही हरकत नाही. पुढे अगदी गाय, बैल, कुत्रा, मांजर किंवा कोणताही प्राणी माणसाकडून खायला भेटते म्हणून ते मांसाळतात पण त्यांची स्वतःच्या जमातीमध्ये सोशल असण्याची शक्यता फारच कमी राहते. 

पण खरचं माणूस हा सोशल आहे का ? त्याच हे सामाजिकीकरण कसे होते, आपले आई-वडील, समाज त्याची भूमिका नक्की काय असते या सर्वच विचारात घेणाच्या गोष्टी. प्रत्येक आई वडील आपल्या जन्म दिलेल्या मुलाला अगदी खूपच मेहनतीने सांभाळतात, त्यांनी त्याला सांभाळणे आणि वाढवणे, त्याच्या लहानपणीच्या गरजा ओळखून त्याला एक विश्व निर्माण करणे ही माता पित्याचे आद्य कर्तव्य आहे असे म्हणायला हरकत नाही. आणि खरच शक्यतो प्रत्येक पालक यामध्ये पुढे मागे बघत नाहीत. मुलाला शिक्षण देणे, त्याला मस्तपैकी खाऊ पिऊ घालणे, त्याचे समाजामध्ये नाव करणे या सर्व गोष्टी पालक पुरेपूर व्यवस्थित करीत असतात. अगदी कधीतर पोटाला चिमटा काढून या गोष्टी करतात. आजकालच्या संयुक्त परिवाराच्या संकल्पनेनुसार एक जोडप्याला एक दोन किंवा अधिकतर तीन अपत्य असतात. नवीन संकल्पनेला थारा देणारे लोक 'हम दो हमारे दो' अशा उक्तीला मान देतात. पुत्र आसक्ती असणारे लोक पहिला मुलगा झाला की थांबतात, पण पहिली मुलगी झाली तर दुसऱ्या अपत्यासाठी धडपडतात. पण दुसरी मुलगी झाली तर खाजगी नोकरी वाले त्यांना काही अडचण नाही पण सरकारी नोकरी वाले सरकारी दबावाने स्वतःवर नियंत्रण करतात

Comments

Popular posts from this blog

स्वच्छता 'त्या' दिवसातली

वाढदिवस, पार्टी आणि बरंच काही .....

पर्यावरण दिन