स्वच्छता 'त्या' दिवसातली
बोलायचे आहे अशा स्वच्छतेविषयी जिथे नेहमीच बोलण्यास लाजल्यासारखे होते प्रा. अलोक अर्जुन अलका पवार आज २८ मे, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस. काही वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचा एक चित्रपट 'पॅडमॅन' आला आणि आपण तो पाहिला, अक्षय कुमार ने घेतलेल्या मोठ्या पावलावर बऱ्याच ठिकाणी चर्चादेखील झाली. आम्ही अगदी गावामध्ये हा चित्रपट मोठा पडदा लावून दाखवला पण. मात्र आजही भारतात, प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात देखील सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी, त्या काळातील स्वच्छता या बाबतीत बोलणे, बहुतांशी शाळा महाविद्यालयांंत शिक्षण सोडा मात्र घरी देखील अशा चर्चा या अगदी वाळीत टाकणाऱ्या समजल्या जातात. मध्ये जीएसटी सुरू झाला तेंव्हा पुण्यामध्ये हुजूरपागा महिला महाविद्यालयात एक चर्चा सत्र आयोजित केले होते. त्यामध्ये आम्ही एक पेपर सादर केला होता. सरकारने बऱ्याच गोष्टींवर जीएसटी लावला होता. त्यामध्ये सॅनिटरी पॅडवर देखील जीएसटी लावला होता आमचा संशोधन पेपर त्यावरच आधारलेला होता. सॅनिटरी पॅडवर एक पुरुष पेपर सादर करतोय तोही चक्क महिला महाविद्यालयात. बऱ्याच मुली बोलायला तयार नव्हत्या. हेच होते नेहमी की य...