वाढदिवस, पार्टी आणि बरंच काही .....
वाढदिवस, पार्टी आणि बरंच काही .....
वाढदिवस म्हणजे असे एकदम भारी असते. हा म्हणजे वय वाढून थोड म्हातारपणाकडे घेऊन जाणारे असते पण एक नवीन उत्सुकता असते. दरवर्षी असे चला वाढदिवस येणार आहे घरघुती का होईना पार्टी करायची आहे. मग नवीन कपडे मस्तपैकी केक आणि असे बरेच काही याची मस्त अशी धूमधाम असतेच. माझ्या वाढदिवसाला माझ्या महाविद्यालयात एक वेगळाच उत्साह असतो दरवर्षी, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण प्राचार्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजेत असा एक मानस असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली आहे. माझे चिमुकले घरी अडकले आहेत. ऑनलाईन वर्ग चालू आहेत. पण वर्षाच्या या ऑनलाईन पद्धतीला विद्यार्थी देखील कंटाळले आहेत.
माझ्या आईच्या गावाला म्हणजे अगदी मामाच्या गावाला मोहोपाड्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजनाचा कार्यक्रम चालू असतो. शिवसेना प्रमुख स्वर्गीय कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने माझे मामाश्री कै. विजय बाळकृष्ण मुंढे याने मोहोपाडा येथे शिवसेना या पक्षाचे कार्यालय स्थापले. तेंव्हापासून बऱ्याच नवनवीन गोष्टी मोहोपाड्यात येऊ लागल्या. लगतच एच.ओ.सी. एच. आय.एल., रिलायन्स अशा भरपूर कंपन्या असल्यामुळे मोहोपाड्याला रसायनी देखील नाव पडले. हेच शिवसेना कार्यालय आजही एका नवीन दिमाखात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच जोमाने काम करते आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. मग घर घेतले होते त्याचे हफ्प्ते कसे फेडायचे याची देखील पंचायत झाली. गरीब आणि मध्यम कुटुंब जेथे आई आणि बाबा दोघेही नोकरी करतात अशा मुलांना शाळेतील माध्यान्य भोजन बंद झाले. मुलांचे नाही तर कुपोषणामुळे स्त्रिया आणि पुरुष दोघांचेही हाल झाले. यामध्येच आपल्या मुख्यमंत्र्यांनी शिवभोजनास सुरवात केली. म्हणजे गरीब कुटुंबासाठी कमी रुपयांमध्ये जेवणाची सोय. गरज ही शोधाची जननी असते आणि हीच गरज ओळखून मुख्यमंत्री साहेबांनी फक्त ५ रुपयांत शिवभोजनची सोय महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये सुरू केली. हे शिवभोजन या जनतेसाठी शिवशाही जेवणापेक्षा कमी नाही.
माझ्या एका दादानेच संतोष पांगत याने साधारण एप्रिल २०२० पासून ही शिवभोजनची मोहीम मोहोपड्यात सुरू केली. गरीब जनता जे योग्य जेवणाची सोय करू शकत नाही ते या ठिकाणी येऊन जेवण घेऊ शकतात. बऱ्याच लोकांना त्यांचे वाढदिवस या प्रकारे करण्याचा आग्रह करणे आणि या मोहिमेत सामिल करून घेणे हे देखील जिकरीचे काम म्हणावयास हरकत नाही. नाहीतर साधारण अर्धा किलोचा केक तोंडावर लावून वाया घालविण्यापेक्षा अशा प्रकारची पार्टी माझ्या वाढदिवसाला झाली हे माझ्यासाठी खूप मौल्यवान होते. अकरा वाजता मी जेवण घ्यायला आलेल्या एका आजीबाईंच्या ऑनलाईन पाया पडलो. त्यांनी देखील तिकडून आशीर्वाद दिले. संतोष दादाने फोन लावून दिला होता.
दादाने लोकांना जेवण वाटताना असे वाटले कसला भारी झाला वाढदिवस साजरा.
पण ही शोधाची जननी इथे थांबत नाही मुळात... एक दिवस आपण भूक भागवू, उद्याच काय? उद्या काय आणखी एकाचा वाढदिवस... भय इथे संपले नाही कारण जो पर्यंत गरिबी निर्मूलन किंवा त्यासाठी प्रयोग संपत नाहीत एकंदरीत गरिबी नष्ट होत नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे थे. म्हणजे जर शिवभोजनच्या किंवा अशा इतर साधनांची निर्मिती या गरीब जनतेला दिली तर त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. म्हणजे स्वच्छता, भाज्या कापणे, तांदूळ निवडणे, स्वयंपाक करणे, वाढणे, वाटप करणे, हिशोब ठेवणे, प्रचार करणे अशा कामात जर गरीब आणि प्रामुख्याने स्त्रियांना घेतले तर सक्षमीकरण देखील होऊ शकते. हा कोरोना काळात अशक्य आहे. पण प्रयत्न केलाच पाहिजे
तर अशा विचार विनिमयात संपन्न झाला वाढदिवस....






या सर्व लोकांचे आशीर्वाद तुला मिळो आणि उदंड आयुष्य लाभो !
ReplyDeleteसंतोष पांगत दादांचे मनापासून आभार.एवढी समाजसेवा करतायेत. माझ्या मोठ्या जावई बापूंच्या वाढदिवशी एवढ्या गरीब लोकांना अन्न वाटप केले. त्या गोरगरीबांचे आशीर्वाद नक्कीच जावई बापूंच्या उपयोगी येतील. आविस्मरणीय असा हा वाढदिवस साजरा झाला.
ReplyDelete