मानवची गोष्ट...
मानवची गोष्ट
© डॉ. अलोक पवार
शामराव बागवे यांनी त्यांच्या शेतात
संत्री लावली. लवकरच त्यांच्या शेतात संत्री यावी म्हणून त्यांनी उत्तम असा
व्यक्ती शेताकडे लक्ष देण्यासाठी नेमायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कृषी
तंत्रज्ञान असलेला व्यक्ती नेमला. मानव भोसले याला ही जवाबदारी देण्यात आली. मानव
आपले काम प्रामाणिकपणे करत होता. एक-एक झाडाकडे
तो जातीने बघायचा. झाडावर कीड लागू नये म्हणून तो काटेकोर पणे लक्ष द्यायचा.
झाडाला पाणी घालणे, खत फवारणी करणे याकडे तो पाहणी करायचा.
शामराव, मानव याच्या कामगिरीवर प्रचंड खुश होते. प्रामाणिक पणे काम करणाऱ्या मानवसाठी त्यांनी शेतात उत्तम घर देखील बांधले.
मानव त्याचे काम दिवसेंदिवस उत्तम करू लागला होता.
शेतासाठी लागणाऱ्या सरकारी योजना यांच्याकडे देखील तो लक्ष द्यायचा. झाडाला
लागलेल्या संत्र्यांना फक्त भारतातच नाही तर बाहेरून देखील मागणी होती. शेतात काम
करणाऱ्या स्त्री वर्गाला देखील मानव काम कसे करायचे, फळांना
कसे सांभाळायचे हे तो व्यवस्थित समजावून सांगत. वय झाल्यामुळे शामराव निधन पावतात.
मात्र मानव आपले काम चोखरित्या पार पाडत असतो. आपल्या सर्व मजुरांना पगारपाणी
व्यवस्थित होईल याकडे तो लक्ष देत होता. त्यामुळे मजूर देखील आपले काम व्यवस्थित
करत होते. मानव याचे काम वाढले होते.
२०१९ मध्ये कोरोना आला. त्यावेळी देखील
फळांना मागणी होती. सरकार त्यावेळी योग्य ती कागदपत्रे जमा करून त्याबदल्यात काही
अनुदान शेतकऱ्यांना देणार असे ठरले होते. मानव शेताकडे त्या काळात देखील लक्ष देत
होता. सर्व मजूर त्या काळात पण सर्व काम करत होते. फळ विक्री त्या काळात देखील
व्यवस्थित होत होती. मात्र सरकारचे कार्यालय कागदपत्रे देण्यासाठी बंद होते.
सरकारने कोरोना झाला की ती कागदपत्रे जमा करा, असा आदेश
दिला होता. त्यामुळे मानव आणि काम करणारे मजूर कोरोना कधी जातोय याची वाट पाहत
होते. कोरोनाच्या आधीच्या काळात सरकारी फायदा हा कधीच चुकला नव्हता. कोरोनाच्या
शेवटी-शेवटी मानवलाच कोरोना झाला.
शेताकडे लक्ष देण्यासाठी नवीन व्यक्ती नेमला पाहिजे. म्हणून शामरावांच्या मुलाने रघुने मानवपेक्षा वयाने जास्त असलेला व्यक्ती नेमला. मानव घरी होता. चौदा दिवसांनी मानवने कामावर पुन्हा रुजू झाल्यावर त्याचे पद आता नवीन आलेला उमा अस्वले हा व्यक्ती बघत होता, हे त्याला कळले. मानवला आता तुला उमा अस्वले यांच्या हाताखाली काम करायचे असे रघुमार्फत सांगितले गेले. थोड्याच दिवसात शामराव यांच्या संत्राचे फॉरेनचे गिऱ्हाइक येणार होते. मानवने त्याच्या काळात योग्य संत्री देऊन या सर्व ग्राहकांना खुश ठेवले होते. पाहुणे आल्यावर उमा हे व्यवस्थापक असल्याने तोच त्यांच्याशी बोलायला गेला. भरपूर अनुभव असूनही साधा ईमेल पाठवणे किंवा सोपे इंग्रजी बोलणे हे देखील उमा यांना जमत नव्हते. पाहुण्यांना देखील हे लक्षात आले. पाहुण्यांनी रघुला दम देऊन सांगितले.
मानव यांच्या कार्यकिर्दीत त्यांना कधीही त्रास झाला नव्हता तेवढा
त्यांना आत्ता या फेरी दरम्यान झाला होता. आपण येऊन सुद्धा आपल्याला चांगला
पाहुणाचार नाही मिळाला म्हणून ते नाराज होते. मानवने तरीही बऱ्याच गोष्टी
सांभाळल्या होत्या. उमा व्यवस्थापक असल्याने इथून पुढची जवाबदारी त्याचीच होती. तो
एकमेव सर्व निर्णय घेत होता. कोरोना काळात राहिलेल्या गोष्टींना देखील तो जवाबदार
होता. मानव त्याच्या झाडांकडे, फळांकडे लक्ष देतच होता.
त्याला उमा व्यवस्थित काम करत नाही हे स्पष्ट दिसत होते. पण आता काय बोलणार आपले
काम भले आणि तो भला असे त्याचे म्हणणे होते. मजुरांची संख्या कमी झाली. मजुरांना
उमाचे काम पटत नव्हते. उमा कामावर नेहमी उशिरा यायचा. आला की झाडाखाली झोपणे,
अशी कामे देखील तो करायचा. कधीतरी झाडाखाली बसून आपली व्यसने देखील
करत.
मजुरांची संख्या कमी झाल्याने झाडांकडे लक्ष
पुरेसं नव्हतं होत. काही मजूर उमाने आपल्या खातीरदारीत वळवली. स्वतःच्या दिमाखीत
असणाऱ्या मजुरांना फायदे देणे आणि बाकीच्या मजुरांकडे दुर्लक्ष करणे यामुळे काही मजूर नोकरी सोडून गेले. या
कालावधीत सरकारने कोरोना काळातली अनुदानची फाईल जमा करण्यास सांगितली. उमा आणि
त्याची दिमाखत करणारे मजूर या सगळ्या गोष्टी विसरले.
मानव याचे पूर्णपणे लक्ष आपली झाडे वाचवण्यात होते. अनुदान आले नाही म्हणून जुन्या मजुरांना फायदे मिळणे अशक्य झाले. शामरावांच्या कंपनीला मजुरांना त्यांचा फायदा अनुदानातून मिळत नाही तर स्वतःहून देणे लागत होते. मात्र रघुला आता उमावर विश्वास जास्त होता. उमा म्हणत होता कोरोना चा कालावधी त्याचा नाही म्हणून तो या अनुदानाकडे दुर्लक्ष करत होता. मानवने शामरावांचे काम सोडण्याचे ठरवले. जड पावलांने त्यांने शामरावांच्या मुलाला आपला राजीनामा दिला.
उमा अजूनही शामरावांची
संत्र्याची बाग सांभाळतो. झाडाखाली मजुरांना घेऊन गप्पा मारणे, व्यसने करने, झोपणे ही कामे अजूनही चालू आहेत.
झाडांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याला फळे लागणे कमी झाले आहेत. काही फळांवर योग्य
फवारणी न झाल्याने ती किडली. बाहेरील मागणी कमी झाली.
मानवची ही कथा जरी काल्पनिक असली तरी एखाद्याने फुलवलेली बाग व्यवस्थापक बदलला
तरीही ती फुललेली असली अशाच अवस्थेत असली पाहिजे होती. नाहीतर मानवने ज्या दुधाची काळजी घेतली त्याची मलई खाण्यासाठी फक्त उमासारख्या व्यक्ती असतात हे रघुला ओळखता आले पाहिजे. या ठिकाणी नवीन व्यवस्थापकाने मानवला हाताशी घेऊन शेताची काळजी
घेणे गरजेचे होते. फळांची काळजी मानवपेक्षा जास्त कशी घेता येईल याकडे लक्ष दिले
पाहिजे होते. आपल्या अनुभवाचा वापर शेती अत्याधुनिक पद्धतीने कशी फुलेल याकडे लक्ष
देण्याची गरज होती. जुन्या कामगारांकडे लक्ष देणे त्यांचे अनुभव पाहणे हे सगळे
करणे अपेक्षित होते. मजूर कामावरून का जात आहेत, याची विचारपूस होणे देखील गरजेचे
होते. मात्र तसे काहीच झाले नाही.
काल्पनिक असली तरी गोष्टींमध्ये वाईट याचे वाटते की उमाच्या वागण्याने शामरावांच्या बागेतली फळे किडू लागली. म्हणजे त्यांचा समाज उपयोग कमी झाला.
© डॉ. अलोक पवार
वरील कथानक वाचून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळव्याव्यात. मानवने नोकरी सोडणे योग्य होते का? उमा सारख्या व्यक्तींचे काय करावे? रघुचे वागणे कितपत योग्य आहे? आता किडक्या फळांचे काय करणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
लवकरच भेटू आणखीन एका नवीन कथनकासह..







सर, आपण वास्तविक अनुभव सुदंर रित्या काल्पनिक कथे मध्ये मांडली आहे. खर तर या कथेमध्ये मानव ने काम सोडण अपेक्षित नाही. कारण ज्या बागेची निगारण ते आपल्या मुलांसारखे करताना दिसून येते. तसेच काही व्यवस्थापकीय बदला मुळे त्यांना त्रास झालेले ही समोर येताना दिसतात. परंतु त्या बागेला वास्तविक त्याच्या सहवासाची नितांत गरज ही होती. मानवच्या या निर्णयामुळे तेथील बागेतील फळांचे प्रगती कुठेतरी नकारात्मक दृष्ट्या खालावत आहे. असे या कथे मध्ये प्रकट होत आहे.
ReplyDeleteमानव खूप कंटाळलेला.. रोजचे उमाचे वागणे.. कामात निरुत्साह.. कदाचित मानव आता दुसऱ्या बागेत काम करू लागला आहे, कदाचित त्याने तिकडे जोमाने फळे वाढवायला सुरवात केळी असतील.
Delete